कोल्हापूर: एसटीतील प्रवाशांकडून पर्स व दागिने यासारख्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. हे गुन्हेगार शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खास पथक नेमले होते पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व महेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एसटीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन कोरोची तालुका हातकणंगले येथील पल्लवी चौगुले ही महिला चोरी करत असते त्यानुसार सापळा रचला. पल्लवी चौगुले ही रामलिंग फाटा येथे चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार होती ही माहिती मिळाली तेथे जाऊन पोलिसांनी तिला ताब्यात घेतले यावेळी तिच्याकडे सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स असे एकूण 87 ग्रॅम वजनाचे दागिने व 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट व जोडवी असा सहा लाख 50 हजार किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्या महिलेकडून आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर, जालिंदर जाधव, शुभम संकपाळ, महेश पाटील, आदींनीही कारवाई केली.