राधानगरी -सह्याद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धामोड येथे शिकत असलेल्या खामकरवाडी येथील इयत्ता नववी व दहावीच्या सहा विद्यार्थिनींनी पलटी झालेल्या ट्रॅक्टर मधून चालकाला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. प्रसंगावधान व धाडस दाखवत ट्रॅक्टर खाली अडकलेल्या व जोरजराने किंचाळत असलेल्या ट्रॅक्टर चालकाला बाहेर ओढून काढत त्याचे प्राण वाचवल्याने या मुलांचे सर्वत्र कौतूक होत आहे .
धामोड येथील सह्याद्री हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ९वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या कु.सलोनी श्रीधर ऱ्हायकर ,कु शितल नामदेव ऱ्हायकर,धीरज बळवंत ऱ्हायकर, यश सुरेश जाधव व दहावीत शिकणाऱ्या प्रतिक्षा प्रकाश ऱ्हायकर व समिक्षा राऊ ऱ्हायकर हे विद्यार्थी शनिवारी सकाळची शाळा व चाचणीचे पेपर संपवून खामकरवाडी गावी पायी चालत जात होते . दरम्यान कुरणेवाडी – खामकरवाडी दरम्यान उताराजवळ येताच त्यांच्या समोरच एक टॅक्टर रस्त्यावरून दहा फुट उंच बांधावरून खाली कोसळला .
डोळ्यासमोर घडलेली ही घटना पाहुन प्रथमतः ह्या मुली खूप घाबरली.कारण त्यावेळी या रस्त्यावर कोणी नव्हते . त्याचवेळी बांधावरून कोसळलेल्या ट्रॅक्टरच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला . या चारही मुलींनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत पाठिवरील दप्तर रस्तावरच ठेऊन तात्काळ टॅक्टर च्या दिशेने धाव घेतली .ट्रॅक्टर चालक पलटी झालेल्या ट्रॅक्टरच्या हुडाखाली अडकला होता . व जीव वाचवण्यासाठी ओरडत होता . मुलींनी क्षणाचाही विलंब न करता टॅक्टर च्या हुडाखाली अडकलेल्या चालकाला बाहेर खेचले व त्याचे प्राण वाचवले . या चार मुलींच्या प्रसंगावधानामुळेच आज एका ट्रॅक्टर चालकाचे प्राण वाचल्याने या मुलींचे सर्वत कौतुक होत आहे .
फोटो ओळी -धामोडे येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रॅक्टर चालकाचे प्राण वाचवल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक डी के पाटील, सुपरवायझर आर जी पाटील , प्रशासन अधिकारी आर एस इंगळे व इतर शिक्षक वृंद