दिंडनेर्ली( सागर शिंदे):
दूधगंगा पब्लिक स्कूल या प्रशालेने अल्पावधीतच आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला आहे. या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,वरिष्ठ अधिकारी बनून उपस्थित आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा आपल्या हस्ते सत्कार होतो ही कौतुकाची बाब आहे.स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम मधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते इस्पूर्ली (ता.करवीर) येथील दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
वर्षभरामध्ये शैक्षणिक तसेच क्रीडा प्रकारात यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमासह लहान मुलांनी योगा,मल्लखांब, रोप योगा आदींची चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब राऊत, उपाध्यक्ष मुंबई हायकोर्ट चे वकील प्रशांत भावके, राम सावरतकर,एकनाथ पाटील, रणजीत शेळके, सरपंच लखन बाबर, उपसरपंच संजय कांबळे,प्राचार्य मीरा राऊत, ज्ञानेश्वर राऊत आदींसह विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उज्वला पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर विजय कांबळे यांनी आभार मानले.