कोल्हापूर प्रतिनिधी (मोहन कांबळे) : जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रातीच्या वेळी व त्यानंतर घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असत त्याच वेळी संक्रातीचा वाण लुटण्यासाठी हळदू कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करणेत येतो येणार सुहासिनी महिलांना आपली आठवण रहावी म्हणून संक्रातीचे वाण देण्याची एक प्रथा आहे, त्यामध्ये महिला चमचा, वाटी,ताट, वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू तसेच अनेक प्रकारचे भेटवस्तु यांचे वाटप करत असतात की ज्या वस्तू प्रत्येकजणी आपल्या घरात नेऊन कुठे ठेवतात याचा थांग पत्ता लागत नाही.परंपरागत पद्धत न अवलंबित करता जिल्हा परिषद कॉलनी मधील महिलानी एकत्र येऊन एक सामाजिक उपक्रमाचा निर्णय घेतला आणि आपापल्या घरात हळदी कुंकवासाठी येणाऱ्या सुहासिनींना परंपरागत संक्रातीचे वाण न देता साखर ,रवा, शेंगदाणे, तेल, मिठ, व ड्रायफ्रुट या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे भेट देण्याची नियोजन केले व त्याप्रमाणे संक्रातीचे वाण देण्यास सुरुवात झालेली आहे. या मुळे महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारे वाण देण्यात यावे असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे.