दिंडनेर्ली: (सागर शिंदे)
कोल्हापूर गारगोटी दरम्यान एस.टी.बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची छेड काढल्या प्रकरणी एस.टी कंडक्टर भाऊसाहेब पांडुरंग पाटील (रा. अर्जुनवाडा) याचे विरुद्ध इस्पूर्ली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी महिला या सोमवारी दुपारी गारगोटी हून कोल्हापूर कडे एस. टी. बस क्र. एमएच.१४.एस.८२२९ मधून प्रवास करीत होत्या.तूरंबे ते शेळेवाडी या गावा दरम्यान फिर्यादी महिला बसलेल्या सीट च्या पाठीमागे आरोपी बसला होता.त्याने मुद्दाम बस च्या सीट वरून हात फिरवत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.तेव्हा संबंधित महिलेने त्या कंडक्टरला बिल्ला नंबर काय असे विचारले असता त्याने अंगावर धावून येत ओरडत नाकाला व तोंडाला बोटाने स्पर्श केला. तुला बिल्ला कशाला पाहिजे मी देत नाही जा,तुला काय केले सांग, मी तुझा विद्यार्थी आहे असे म्हणून तुला तुझी लायकी काय आहे ते दाखवितो, तुझी सगळी कुळीमुळी काढतो असे म्हणून ओरडत शिवीगाळ केली. तसेच तुला कुठे तक्रार द्यायची आहे ते दे असे म्हणून थांब तुला दाखवितो अशी धमकीही दिली असल्याची फिर्याद संबंधित महिलेने पोलिसांत दिली. यानंतर पोलिसांनी कंडक्टर भाऊसाहेब पाटील याला अटक केली असून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्द्स्सर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुतार अधिक तपास करीत आहेत.