कोल्हापूर: एस जे पी एस होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर संचलित संजीवनी रुग्णालयातर्फे मधुमेह रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत संजीवनी रुग्णालय, रुक्मिणी नगर 2103/11 ई वॉर्ड,कोल्हापूर येथे होणार आहे. तरी रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शिबिर काळात रक्तातील साखरेचे प्रमाण, पाय संवेदन तपासणी, पायाच्या नसातील जखम भरून न येणे किंवा ते धोके टाळण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
पूर्व नोंदणीसाठी 0231-2538906,2536905या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.