Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAdministrativeडॉ. डी. वाय. पाटील बी टेक ऍग्रीच्या दोन विद्यार्थिनीची अन्न सुरक्षा अधिकारी...

डॉ. डी. वाय. पाटील बी टेक ऍग्रीच्या दोन विद्यार्थिनीची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी पदावर यशस्वी निवड झाली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे

विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. अत्याधुनिक शैक्षणिक प्रणाली, प्रयोगशाळा, कुशल प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांना सातत्याने दिले जाणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्त्वाची ठरली आहेत.

प्राचार्य डॉ. एस. बी . पाटील म्हणाले, शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्याना हे यश मिळवता आले याचा आनंद आहे. महाविद्यालयातील करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंटसेल विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभ्यासक्रम तसेच मुलाखतींसाठी विशेष तयारी करून घेते. तज्ज्ञ प्राध्यापक व इंडस्ट्री पार्टनर्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचा चांगला फायदा होत आहे. भविष्यात अधिक विद्यार्थी अशा यशाची पुनरावृत्ती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यशस्वी विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या दर्जेदार अभ्यासक्रम, वेळोवेळी मिळणारी प्रेरणा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाला दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा देण्याचे काम डीन अकॅडमीक, प्रा. पी. डी. उके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व माजी विद्यार्थी संघटना यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News