कोल्हापूर – विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी करवीर व शहर उपविभागीय कार्यालय, जुना राजवाडा, शहर वाहतूक नियंत्रण विभागाची तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. यावेळी पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड, दाखल व उकल गुन्ह्यांची संख्या अधिकाऱ्याकडे दिलेल्या तपासाचे बारकावे, पेंडिग तक्रारी याबाबत तपासणी केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या पोलीस ठाण्यांची आयजींकडून तपासणी केली जाणार आहे. त्या पोलीस ठाण्यातील पेंडीग गुन्हे निकाली काढणे, फायली वरील धूळ स्वच्छ करून निटनेटकेपणा आणुन तसेच हत्यारे व्यवस्थित ठेवणे, रंगरंगोटी, पोलीस ठाण्यातील फलक दुरुस्त करणे या गडबडीत होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कचरा, तसेच झांडांची मुळे, आडव्या आलेल्या फांद्या काढण्यात आल्या होत्या. सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतर तपासणीची प्रतिक्षा करत होते.