आदमापूर /प्रा.शिवाजी खतकर:
समाजातील दुखः दारिद्रय, द्वेष,मत्सर, हिसांचार, जातीयता नष्ट करण्यासाठी संस्कारदिपाची खरी गरज आहे. बलशाली युवा ह्रदय संमेलनातून नव्या पिढ्यानी सुसंस्काराच्या पणत्या बनून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण करा. असे आवाहन इंद्रजीत देशमुख यांनी केले.
शिवम प्रतिष्ठानच्यावतीने घारेवाडी (ता. कराड) येथे २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षातल्या बलशाली युवा ह्रदय संमेलनाचा सांगता समारोप झाला. देशमुख यांनी उपस्थीत युवक-युवतीना मार्गदर्शन केले. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण प्रांताधिकारी सोपान टोणपे, अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, प्रताप भोसले, प्रताप
कुंभार, देवेंद्र पिसाळ, यतिन सांवत, भगवान नलवडे, धनंजय पवार, दत्तात्रय पवार, डॅा.शंतनू कुलकर्णी, अरविंद कलबुर्गी, संभाजी देवकर, कृष्णासा सोळंकी, संजीव शहा, संजय पाटील, विश्वनाथ खोत, चंद्रकांत गायकवाड, के. द. पाटील, प्रविण दाभोळे, विजयालक्ष्मी शेट्टी, सुनिता गरूड, सुहास पाटील, सचिन पाटील, विकास गरूड, सलिम मुल्ला, सोमनाथ येरनाळकर, अशोक सस्ते, जगदीश खामकर, सुहास नेमाणे, बाळासाहेब श्रीखंडे, संस्थापक रयत प्रबोधिनी पुणेचे उमेश कुदळे, यासह कोल्हापूर, पुणे, बारामती विभागप्रमुख प्रतिष्ठानचे विश्वत,संचालक,साधक राज्यातून आलेले युवक-युवती याप्रसंगी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, कृतज्ञता हे फार मोठे मूल्य आहे. ते सर्वानी जपायला पाहिजे. तुमचा भावनिक गुणांक हा श्रेष्ठ असला पाहिजे. तो जपता आला पाहिजे. मानवता पेरणारे तरूण माणसाला जोडणारे तरूण अंधार संपणाऱ्या मशाली अणि शांतीसेना तुमच्यातून निर्माण झाल्या पाहिजे. जो ज्या क्षेत्रात आहे. त्या क्षेत्रात उच्च पदावर घेऊन जाणारी समाज व्यवस्था तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. आज
समाजात राजकीय सामाजीक शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात प्रचंड विषमता आहे. का तर जाती-पोटजाती त्यास मुळ कारण आहे. ही सर्व विषमता नष्ठ झाली पाहिजे. बापपिढीने जगण्याच्या लायकीचा समाज निर्माण केला पाहिजे. मगच उतराई व्हायचे असते. संतती, संपत्ती अणि झोप प्रारब्धाने मिळते. म्हणून माझी तुमच्या रूपाने सुरू असलेली फॅक्टरी चिरंतर सुरू राहवी. यासाठी संमेलनाचा खटाटोप येथे गेली २५ वर्षे येथे सुरू आहे. माणूस म्हणून जगण्याच्या व्याख्येत आपल्या माणसाला न्याय तुम्ही द्या. तुमच्यापेक्षा कनिष्ठ माणसाला तुम्ही वागणूक कसी देता त्यावर तुमचा स्वभाव व आयुष्य अवलंबून आहे. तुमची ओळख त्यावर ठरते. अंधाराला शिव्या देऊन अंधार संपणार नाही. म्हणूनच तुमच्या रूपाने इवलिशी पणती बनून यापुढे काम तुम्हाला करावयाचे आहे. मागील आठ-दहा दिवसल्या समाजातील हिंसावर प्रकाश तुम्ही टाका. छोट्या-छोट्या गोष्टीचा राग माणसाना येतो अणि हिंसा घडतात. त्यावर तुमचा संयम हा एकच मार्ग आहे. माणूस जोडणे अणि माणुसकी जपणे हा एकच धर्म आहे. तो तुम्ही पाळला पाहिजे. संमेलन यशस्वीतेसाठी राबलेल्या सर्वच व्यक्तीचा सन्मान यावेळी करण्यात आला.
नारायण आरतीने गळाभेटीने संमेलनाचा समारोप यावेळी झाला.