कोथळी प्रतिनिधी:
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा परिसरात धुरळा उडला आहे. एकूण दोन पॅनेल मध्ये ही निवडणूक होत आहे . यामधील महाविकास आघाडीच्या प्रचार पत्रिकेवर शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचा फोटो नसल्याने नाराजी होती परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यात सुधारणा केली जाईल व आपला सन्मान केला जाईल अशी ग्वाही दिली होती या विनंतीला मान देऊन शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या प्रचार शुभारंभाला उपस्थित राहिले होते यामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ घोटवडे येथील स्वयंभू मंदिर मध्ये आयोजित केला होता या शुभारंभाच्या वेळी काँग्रेस महाविकास आघाडी कडून माघार घेतलेल्या उमेदवारांच्या नावाचे वाचन करण्यात आले होते .यामध्ये काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )या पक्षाच्या माघार घेतलेल्या उमेदवारांची व त्यांच्या नेत्यांचे आभार मानण्याचे वाचन करण्यात आले परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दाखल केलेल्या उमेदवारांची व शिवसेना (उबाठा)जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे कोणाचेच नाव घेऊन आभार न मानल्याने संतप्त झालेल्या पदाधिकारी व शिवसैनिक यांनी या प्रचार शुभारंभातुन काढता पाय घेतला. त्यामुळे येणाऱ्या ह्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काय निर्णय घेणार काय निर्णय घेणार ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.