कोथळी करवीर /प्रतिनिधी:
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विसर पडलाय काय अशी विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले परंतु या प्रयत्नांना बिनविरोध करण्यासाठी एकमत न झाल्यामुळे यश आले नाही त्यामुळे ही निवडणूक दोन पॅनेल मध्ये लढवली जात आहे बिनविरोध निवडीसाठी महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट व इतर घटक पक्ष तसेच महायुती कडून शिवसेना ,राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आरपीआय या पक्षांच्या नेत्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते अंतिम टप्प्यांमध्ये ही निवडणूक दोन पॅनेल मध्ये लढली जात आहे जागावाटप करत असताना महाविकास आघाडी कडून काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष व शरदचंद्र पवार गट पक्षाच्या उमेदवारासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केले होते महाविकास आघाडीने इतर पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा न दिल्याने या महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विसर पडला की काय ? अशी भावना कार्यकर्त्यांतुन बोलली जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवलेले काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उ बा ठा) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आपल्या पक्षाच्या शिलेदारांसह मतदारसंघात रान उठवले होते व आक्रमक प्रचार करत एक वातावरण निर्मित केली होती यावेळी येथून पुढे सर्वच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचा कायमच विचार केला जाईल असे नेते व्यासपीठावर सांगत होते परंतु भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध चर्चेला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बोलवले जाते व पॅनेलमध्ये जागावाटप देत असताना या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलले गेले आहे यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विसर पडला काय अशी भावना व्यक्त होत आहे