Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAdministrativeआई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांना प्रयाग चिखली ग्रामसभेचा दणका;  शासकीय मदत न देण्याचा ग्रामसभेचा...

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांना प्रयाग चिखली ग्रामसभेचा दणका;  शासकीय मदत न देण्याचा ग्रामसभेचा ठराव..

प्रयाग चिखली वार्ताहर: 
आपल्या वृद्ध माता-पित्यांना न सांभाळणाऱ्यांना यापुढे ग्रामपंचायत तसेच शासकीय पातळीवर होणारी मदत, मिळणारे दाखले रेशन धान्य अशा प्रकारची कोणतीही मदत देण्यात येऊ नये अशा स्वरूपाचा ठराव करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामसभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी चिखलीचे लोकनियुक्त सरपंच रोहित रघुनाथ पाटील हे होते.
सध्या समाजामध्ये आई-वडिलांच्या प्रॉपर्टी वर नागोबा होऊन बसलेल्या मुलांकडून आई-वडिलांची पालनपोषणाची जबाबदारी घेतली जात नाही चिखली गावामध्ये देखील अशी उदाहरणे कमी नाहीत
आई-वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या नाठाळ मुलांना चपराक देण्याच्या दृष्टीने ग्रामसभेत या विषयावर चर्चा व्हावी असे मत काहींनी मांडले गावामध्ये यापूर्वी आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे त्यांना स्वतंत्र ठेवणे आणि त्यांची जबाबदारी न घेणे अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आई-वडिलांची प्रॉपर्टी पाहिजे मात्र त्यांची जबाबदारी नको या प्रवृत्तीला चपराक म्हणून आई-वडिलांची तक्रार घेऊन अशा संबंधित मुलांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न देण्याचा ठराव प्रयाग चिखली ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारीच्या सभेमध्ये करण्यात आला. सध्या या ठरावाची चर्चा गाव परिसरात जोरात चालू आहे. वृद्ध माता-पित्यांच्या कडून मात्र या ठरावाचे स्वागत होत आहे.
दरम्यान याच ग्रामसभेत नवीन चिखली येथील पुनर्वसन वसाहती मधील शिल्लक प्लॉटवर झालेल्या अतिक्रमणाबाबत जोरदार चर्चा होऊन झालेले अतिक्रमण हटवण्याचा ठराव तसेच गावठाण वाढ मागणी ठराव कचरा, उठाव, स्वच्छता असे विविध ठरावही यावेळी करण्यात आले गावामध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसवल्याची आणि पुनर्वसन वसाहती मधील अतिक्रमण पूर्ण ताकतीने हटवण्याबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती यावेळी सरपंच रोहित पाटील यांनी दिली.
विषय वाचन ग्रामपंचायत अधिकारी सतीश पानारी यांनी केले.या सभेला उपसरपंच शारदा सुनील कांबळे यांच्यासह सर्व सदस्य ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News