Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALभोगावती शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तटस्थ भूमिका

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तटस्थ भूमिका

कोथळी करवीर/ प्रतिनिधी:

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा भोगावती परिसरात धुरळा उडाला असून एकूण दोन पॅनेल मध्ये ही निवडणूक होत आहे .यामध्ये  महाविकास आघाडीच्या प्रचार पत्रिकेवर जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचा फोटो नसल्याने नाराजी आहे. तसेच घोटवडे तालुका, राधानगरी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान न दिल्याच्या कारणाने  राधानगरी व करवीर तालुका पदाधिकारी आपली नाराजी व्यक्त करत निवडणुकीतून काढता पाय घेतला होता.

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोथळी ता. करवीर येथे निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांची आजबैठक घेण्यात  आली. या बैठकीमध्ये या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार तटस्थ  राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी करवीर प्रमुख भरतआमते, राधानगरी तालुकाप्रमुख बाबा पाटील कौलवकर, विक्रम पाटील (ठीकपुर्ली), कृष्णात मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख दीपक बुवा, करवीर तालुका महिला संघटिका शुभांगी तानाजी पोवार,
संतोष पाटील, बजरंग मोरे ,राशिवडे शहाजी पाटील चापोडी, अनिल शेळके (शेळकेवाडी) सुभाष कोइकडे (कुरुकली) , संतोष कारंडे (बेले), निवास चव्हाण (हळदी ) आनंदा खाटकी (हसुर) तानाजी पवार राजेंद्र आमते, कोमल आमते ,धोंडराम सुतार , नामदेव पाटील करवीर व राधानगरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .आभार कृष्णात मोरे यांनी मांडले

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News