Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialमहाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

महाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

महाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाही स्नानसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहे. या घटनेनंतर शाही स्नान रद्द करण्यात आला आहे. 

प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आहे. तात्काळ मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News