छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशल व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. दरम्यान, चित्रपटाचे‘जाने तू’ हे गाणं नुकतचं लाँच झाले असून या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नीची झलक पाहायला मिळाली.
काही दिवसांपूर्वीच ‘छावा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर दिसला होता. तर आता निर्मात्यांनी लाँच केलेल्या गाण्यात नाना पाटेकरांच्या पत्नी नीलकांती पाटेकर झळकल्या आहेत. ‘जाने तू’ गाण्यातील एका सीनमध्ये महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांचं त्या औक्षण करत असल्याचं पाहायला मिळतं. अरिजित सिंहच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मधून नीलकांती पाटेकर कलाविश्वात पुनरागमन करत आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, गाण्याच्या टीझरमध्ये त्यांचा लूक पाहता त्या सिनेमात धाराऊंची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. धाराऊ या शंभूराजेंच्या दूधआई होत्या.
‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सुद्धा मराठीच आहेत. यापूर्वी त्यांनी विकी कौशलबरोबर ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाच्यावेळी काम केलेलं होतं. लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल या दोघांचा हा चित्रपट दुसरा आहे