पुणे: पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंध घाटात शंभर फूट खोल दरीत इको कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शुभम शिर्के (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 8 जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत घडली. महाड होऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमचा सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघात नेमका कशामुळे झाला याचा भोर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अपघातात शुभम शिर्के (वय 22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मंगेश गुजर (वय 26), आशिष गायकवाड (वय 29), सिद्धार्थ गंधणे (वय 26), सौरभ महादे (वय 22), गणेश लवंडे (वय 27), अमोल रेकीणरं (वय 27), यशराज चंद्र (वय 22) आणि आकाश आडकर (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत.