Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeAppointmentडी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर येथील जॉब फेअरमधून 117 जणांची निवड

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर येथील जॉब फेअरमधून 117 जणांची निवड

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्याना नोकरीची संधी मिळाली आहे.

कोल्हापुरातील युवकांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध व्हावी त्यासाठी डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून जॉब फेअरचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली अनेक रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात असलायचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले.

कॅम्पस संचालक डॉ अभिजीत माने म्हणाले, इलेक्ट्रिकल, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक व मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना या संधीचा चांगला फायदा झाला. जिल्ह्यातील 20हुन अधिक अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या जॉब फेअरमध्ये अदाणी ग्रुप ,लोढा ग्रुप , बजाज ,एसबीआय ,जस्ट डायल, एल कॉम यासारख्या कंपन्या सहभागी होत्या.

प्राचार्य डॉ सुरेश माने म्हणाले, श्रम व रोजगार मंत्रालय आणि जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता केंद्र कोल्हापूर यांचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले. तसेच या रोजगार मेळाव्यास 90 पदवीधरांना विविध कंपन्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.

संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रीती भोसले व श्री जमीर करीम, सहायक आयुक्त मेघना वाघ व यंग प्रोफेशनल यांचे सहकार्य लाभले.

साळोखेनगर – विविध कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News