Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeFinanceबजेट 2025: समजून घ्या काय महाग ? काय स्वस्त ?..

बजेट 2025: समजून घ्या काय महाग ? काय स्वस्त ?..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमधून मोदीसरकारने अनेकांना मोठा दिलासा दिला आहे.  शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तर जाणून घेऊया मोदी सरकराने जाहीर केलेल्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महागणार?

काय होणार स्वस्त?

  • LED-LCD च्या किंमती कमी होणार

  •  टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार 

  •  मोबाईल स्वस्त होणार

  •  मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट 

  • कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री

  • लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर 

  •  भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार

  •  चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार 

  •  गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी करणार

तर काय महागलं?

 इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ

बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.

अर्थसंकल्पात घेण्यात आलेलं मोठं निर्णय कोणते?

डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. 

कापूस उत्पदकांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. कापूस उत्पादकता मिशन (मिशन फॉर कॉटन प्रोडक्टीव्हीटी) ५ वर्षांसाठी असेल. या मिशनमधून कापसाची उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 

किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापनेची घोषणा करण्यात आली असून छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना जाहिर करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News