विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील फक्त खडकवासला विधानसभा मतदारसंघात आता प्रारूप मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. त्यात शरद पवार पक्षाचे ८ आणि काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश होता. यामधील बारामती विधानसभा मतदार संघातील युगेंद्र पवार यांनी माघार घेतल्यानंतर १० अर्ज शिल्लक राहिले होते. त्यानंतर भोर, पुरंदर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही आपला मागे घेतला.
त्यानंतर उरलेल्या सहा मतदारसंघांमधील उमेदवारांनी उच्च न्यायालयात ईव्हीएम बाबत याचिका दाखल केली आहे. फक्त खडकवासला मतदारसंघातील उमेदवाराने आपला तपासणी व पडताळणीचा अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील अर्जावर प्रतिरूप मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे.
खडकवासलात सचिन दोडके (राष्ट्रवादी -शरद पवार), भीमराव तापकिर (भाजप), मयूरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो पण गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपलं वर्चस्व दाखवलं आहे.