Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialमुलीवर झालेले अत्याचार पाहून खासदाराला अश्रू अनावर; पत्रकार परिषदेत टाहो

मुलीवर झालेले अत्याचार पाहून खासदाराला अश्रू अनावर; पत्रकार परिषदेत टाहो

अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचा भावनिक व्हिडीओ समोर आली आहे. एका मुलीवर झालेलं अत्याचार पाहून खासदार प्रसाद यांना अश्रू अनावर. पत्रकार परिषदेत बोलताना टाहो फोडला.

अयोध्येत एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अयोध्येतील मिल्किपूर मतदारसंघात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचा मृतदेह भयावह स्थितीत आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली पण ते गहिवरले.

पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? 

“आत्तापर्यंत मी निर्भया हत्याकांडाबाबतचे ह्रदयद्रावक घटना ऐकत होतो. काल मी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे” असा उल्लेख करताच खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं.

पुढे ते म्हणाले, आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? देश आम्हाला याबाबत विचारणा करेल. मुलीला विवस्त्र करुन काय काय करण्यात आले. तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण निर्भयापेत्रा भयंकर आणि गंभीर आहे. मी त्या मुलीच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तिचा अंत्यविधी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार होऊ शकला नाही. तिचा दफनविधी करण्यात आलाय. अशी माहितीही खासदारांनी यावेळी दिली.

मुलीसोबत नेमकं काय घडलं? 

मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचे दोन्ही डोळे काढून टाकण्यात आले आहेत. शिवाय, शरिरावर देखील अनेक जखमी असल्याचे समोर आले. अनेक हाडेही मोडलेल्या स्थितीत आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News