कोल्हापूर: वाढते वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे.कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे निरीक्षण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार केले होते. या पथकाने तपास सुरू केला असता दोन अल्पवयीन मुलांनी बुलेट गाडी चोरल्याचे माहिती मिळाली व ती बुलेट गाडी विकण्यासाठी हातकणंगले तालुक्यातले अतिग्रे गावच्या हद्दीतील एक्सेल हॉटेल जवळ येणार असल्याचे समजले. पथकाने सापळा रचला होता यावेळी तेथे बुलेट मोटरसायकल विकण्यासाठी दोन अल्पवयीन मुले व आपला साथीदार स्वप्नील सुनील नलावडे वय 19 राहणार शाहूनगर हातकणंगले यास रंगेहात पकडले. त्यांनी ती बुलेट मोटरसायकल चोरीची असल्याचे कबूल केले. त्यांनी इचलकरंजी मधून बुलेट ,शिवाजीनगर येथून बुलेट ,शहापूर येथून 2 स्पेंडर चोरून आणल्याचे सांगितले. ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपी स्वप्निल नलावडे लाही ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे ,अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, महेश खोत, महेश पाटील ,विशाल चौगुले ,प्रदीप पाटील, लखन पाटील आदींनी ही कारवाई केली.