दिंडनेर्ली : (सागर शिंदे)
नंदगांव ते खेबवडे (ता.करवीर) दरम्यान दूधगंगा नदी पुलाजवळ गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना इस्पूर्ली पोलिसांनी चार तरुणांना पकडले असून त्यांचेवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना गांजा पुरवणारा मुख्य आरोपी अमोल भारत भाट (रा. मातंग वसाहत,कंदलगाव) याला पाठलाग करून पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इस्पुर्ली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना दूधगंगा नदी पुलाजवळील जॅकवेल जवळ मोकळ्या जागेमध्ये अनिकेत बाळासो बोडके (वय २१), सौरभ आनंदा चौगुले (वय २१), सागर विजय चौगुले (वय २१), रशब किरण हातकर (वय २१ )
(सर्व रा.खेबवडे ) हे गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना पकडले असून त्यांच्याकडील गांजा सदृश्य अंमली पदार्थही ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कंदलगाव येथील अमोल भाट याचेकडून गांजा विकत घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्द्स्सर शेख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसहित कंदलगाव येथे जाऊन भारत भाट याला पाठलाग करून पकडले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक मुद्द्स्सर शेख,ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नलवडे, फौजदार अजित देसाई, सहाय्यक फौजदार किरण माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल पाडळकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव,कांबळे,कदम,पाटील यांनी कारवाई केली.
अमोल भाट हा सराईत गुन्हेगार असून तो मूळ राजस्थानचा आहे. त्याच्याकडून अजून बऱ्याच गुन्ह्यांची माहिती माहिती मिळण्याची शक्यता असल्याने कोर्टात रिमांड ची मागणी करणार असल्याचे स.पो.नि. मुद्द्स्सर शेख यांनी सांगितले.