Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomeAdministrativeनवीन दुचाकी नोंदणी मालिका 10 फेब्रुवारीपासून सुरु ; पसंती क्रमांकही देता येणार

नवीन दुचाकी नोंदणी मालिका 10 फेब्रुवारीपासून सुरु ; पसंती क्रमांकही देता येणार

कोल्हापूर, दि. 5 : खासगी दोन चाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GW दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर या कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी नोंदणी मालिका MH09-GX करिता दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत खिडकी क्रमांक 10 येथे स्विकारण्यात येतील.

वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावे-
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पेऑर्डर अर्जासोबत देवू नये.
Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा, इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही.पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकाच Demand Draft (धनाकर्ष) दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात सादर करावा.11 फेब्रुवारी 2025 रोजी 5 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिध्द केल्या जातील. लिलावातील जादा रकमेचा एकच डीडी स्वीकारण्यात येईल.
धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटारवाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराकडून दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहिल. एकापेक्षा जास्त असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाचा लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल व लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेला मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबईल नंबर लिहला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादीमध्ये आपले नाव आले तरी आपल्यास आकर्षक क्रमांक मिळणार नाही.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली किंवा मालिका संपल्यानंतर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रर्माकांच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News