Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeकोल्हापूर पोलिसांनी गांजाविरुद्ध उघडली विशेष मोहीम; तीन दिवसात 55 जणांवर कारवाई...

कोल्हापूर पोलिसांनी गांजाविरुद्ध उघडली विशेष मोहीम; तीन दिवसात 55 जणांवर कारवाई !

कोल्हापूर: जिल्ह्यात गांजा व इतर तत्सम नशेली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा तरुणांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. अशा व्यसनाला आळा घालण्यासाठी तसेच तरुण वर्गाला गांजा सारख्या व्यसनापासुन दुर करणेसाठी कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई उघडली आहे.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक ०४/०२/२०२५ ते २८/०२/२०२५ दरम्यान विशेष मोहिम राबवणार आहेत.

या मोहिमेनुसार गेल्या तीन दिवसात पोलिसांनी 46 खटले दाखल करून 55 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा पुरवठा करणाऱ्या चौघा जणांची नावे समोर आली आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.सदरची विशेष मोहिम अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे.
आपल्या परिसरामध्ये अथवा आपणास गांजा अथवा गांज्या सारखे तत्सम नशेचे पदार्थाची कोणी नशा करणे, विक्री करणे अथवा साठा करत असल्याची माहिती असल्यास, त्याबाबत संबधीत पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांना केलेले आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News