कोल्हापूर: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्हयात हाती घेतलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत अमली पदार्थ विक्री करणा-या टोळीचा पोलीस शोध घेत होते.
त्यानुसार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आसुर्ले ता.पन्हाळा या गावी एक महिला गांजा विक्री करत आहे. पन्हाळा पोलीस ठाण्याने सापळा रचून आसुर्ले गावी जावुन गांजा विक्री करणा-या त्या महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडुन साधारण ४७० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा सापडला. तिच्याकडून अधिक माहिती घेतली असता सदरची महिला हि गांजा राज् मकबूल मुल्ला रा. अंकलखोप जि. सांगली याचेकडून घेवून विक्री करत असलेचे तिने सांगितले. पोलिसांनी राजु मकंबुल मुल्ला रा. अंकलखोप जि. सांगली व रंजना रमेश नावर वय-४९ रा. आसुर्ले ता. पन्हाळा जि. कोल्हापुर या दोघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पन्हाळा पोलीस ठाणे प्रभारी महेश कौडभैरी करत आहेत.
सदर आरोपींचे शोधकामी तपास पथकातील अंमलदार पो.हवा समिर मुल्ला, पो. अंमलदार रविंद्र कांबळे तसेच सदरची कामगीरी संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. समिर मूल्ला, पोहकों किशोर पाटील, पो.ना. सचिन पाटील, म.पो.ना. आशा पाटील, पोकों रविंद्र कांबळे, पो.कों. पडवळ, पो.कॉ .अरुण पाटील व सायबर पोलीस ठाणे यांनी हि कारवाई केली आहे.