Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALत्याने माझ्या शरीराला हात लावला; करुणा शर्मा यांचा खळबळजनक दावा

त्याने माझ्या शरीराला हात लावला; करुणा शर्मा यांचा खळबळजनक दावा

मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले असून दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यसांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य संशयी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात वाल्मिक कराडने अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केली असल्याचा धक्कादायक आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मा नेमकं काय म्हणाल्या?

कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करत वाल्मिक कराडने अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर, ‘माझ्या पतीसमोर वाल्मिक कराडने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचा सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र मला ते अजूनही मिळालेले नाही. असा आरोप करत त्या पुढे म्हणाल्या,  घडलेला प्रकार मी घरी येऊन मुलांना सांगितला. तेव्हा पतीने आई खोटं बोलत  असल्याचं सांगितलं. मग मुलांनीही त्यावर विश्वास ठेवला. पण एक  बाई खोटं बोलत नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या.

तसेच, माझ्या बहिणीसोबतही शारिरीक हिंसाचार झाला. मला दोन खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. 45 दिवस मी येरवाडा जेलमध्ये होते. मला कोणी भेटण्यासही आलं नाही. कोण मला काढणार याची वाट पाहत होते. बीडच्या जेलमध्ये मी 16 दिवस होता. कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली जाते. माझ्या गालावर मारलं, चुकीच्या जागी हात लावतो आणि महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री काही करत नाही. मी कधीच आत्महत्या केली असती. एकदा प्रयत्नही केला. पण मला मुलांचा चेहरा पाहण्यास सांगण्यात आलं, अशी माहितीही करुणा शर्मा यांनी यावेळी दिली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News