Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeपुण्यात हॉटेल मालकाची पर्यटकाला कपडे फाटे पर्यंत मारहाण !

पुण्यात हॉटेल मालकाची पर्यटकाला कपडे फाटे पर्यंत मारहाण !

पुण्याच्या पर्यटकाला दोरीने बांधून कपडे फाटेपर्यंत हॉटेल मालकासह 6 जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुडाळ तालुक्यात ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळपोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश बबन सकपाळ (वय ३३, रा. कात्रज, पुणे) असे पर्यटकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गावर झारप झिरो पॉईंटवर ही घटना घडली. 

याप्रकरणी, तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय ५७), अब्बास ऊर्फ साहिल शराफत शेख (१८), श्रीमती परवीन शराफत शेख (४२), श्रीमती साजमीन शराफत शेख (१९) आणि तलाह करामत शेख (२६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं काय घडलं? 

रुपेश बबन सकपाळ हे मित्रांसह गोव्याला जात होते. चहा पिण्यासाठी झाराप झिरो पॉईंट येथे थांबले. त्यावेळी एका चहाच्या कपात माशी पडलेली सपकाळ यांना दिसली.  ही बाब हॉटेल मालक तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनास आणुन दिली आणि चहा बदलून देण्यास सांगितलं. पण चहा बदलून देण्यास हॉटेल मालकानं नकार दिला. त्यावेळी चहाचे पैसे देणार नाही, असे सकपाळ यांनी सांगितलं. त्यावरून हॉटेल मालक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी हॉटेल मालकासह सहा जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला रस्त्यावर झोपविले आणि मारहाण केली.

तसेच सपकाळ यांच्यासोबत असलेल्या संजय सुदाम चव्हाण (पुणे) यालाही मारहाण केली. सपकाळ यांचे कपडे फाडून हातपाय दोरीने बांधून ठेवले. याबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर तपास करीत आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News