रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आरबीआयचं पतधोरण जाहीर कर्जदारकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात करण्यात आली असून रेपो रेट 6.25 टक्क्यांवर.
पतधोरण विषयक समितीची बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या बैठकीदरम्यान, आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं 25 बेसिस पॉइंटनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 6.25 टक्के रेपो रेट असेल, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत.
तसेच, महागाईचा नियंत्रित करताना आर्थिक विकासावर भर देण्याचं धोरण स्वीकारल्याचं संजय म्हलोत्रा यांनी म्हटलं आहे. 2026 च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून जीडीपी वाढीमध्ये सुधारणा दिसून आली. येत्या काही महिन्यांत महागाई सामान्य होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 25 साठी जीडीपी वाढ 6.4% राहण्याचा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला. यासोबतच, आंतरराष्ट्रीय मार्केटची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. मात्र त्यात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.
संजय मल्होत्रा यांनी नुकतंच 10 डिसेंबर रोजी गव्हर्नरपदाचा कारभार हाती घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते मॉनिटरी पॉलिसीवर भाष्य केलं आहे. मे 2020 नंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात करण्यात आली आहे.