प्रयाग चिखली वार्ताहर:
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस व जनता यांच्यामध्ये सुसंवाद गरजेचा असल्याचे प्रतिपादन करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी करवीर पोलिसांच्या वतीने आयोजित जनता दरबार कार्यक्रमात केले.
जनतेच्या अडीअडचणीत समजावून घेणे आणि अडचणीचे निरसन करणे कायदा व सुव्यवस्था तसेच नवीन कायदे याबाबत मार्गदर्शन करणे. कार्यक्षेत्रात घडणाऱ्या शेती पंप केबल पाईप आदी चोरीच्या घटना घरफोडी लुटमारव इतर गुन्ह्याना आळा घालण्याचे दृष्टीने ग्राम सुरक्षा दला प्रमाणे यंत्रणा राबवणे बाबत पोलीस व जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून एक विश्वासाचे नाते निर्माण व्हावे यासाठी करवीर पोलिसांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन आंबेवाडी येथील श्रीराम समर्थ हॉलमध्ये करण्यात आले.
यावेळी आंबेवाडी प्रयाग चिखली वडणगे केर्ली रजपुतवाडी सोनतळी गावातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मते मांडली पोलिसांच्या वतीने निरीक्षक किशोर शिंदे हेड कॉन्स्टेबल संजय काशीद राजेंद्र संकपाळ अविनाश पोवार प्रदीप यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर एडवोकेट अभिजीत पाटील यांनी नवीन कायदा विशद केला. यावेळी आंबेवाडी चे माजी सरपंच एम.जी. पाटील सरदार साळोखे चिखलीचे तंटामुक्त अध्यक्ष – बळीराम कळके कुमार दळवी किरण कांबळे ज्योतीराम घोडके अनिल पाटील मच्छिंद्र पाटील सुजित पाटील मदन पाटील आनंदा सांगले व नागरिक उपस्थित होते