Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialस्नानपर्व काळात क्षेत्र प्रयाग येथे ध्येयवेड्या पंडित मानेचा वृक्षारोपण संकल्प अविरत ..

स्नानपर्व काळात क्षेत्र प्रयाग येथे ध्येयवेड्या पंडित मानेचा वृक्षारोपण संकल्प अविरत ..

शहाजी पाटील प्रयाग चिखली: 
वसुंधरेच्या संवर्धनासाठी श्री संत श्री बाळूमामाच्या शिकवणीनुसार गेल्या पंचवीस वर्षात फक्त आणि फक्त अन्नसाखळी निर्माण करणारी झाडे लावणारा अवलिया पंडित माने ( रा.केर्ली) यांची क्षेत्र प्रयाग येथील वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप मोहीम १४ जानेवारीपासून अविरत सुरू आहे.
क्षेत्र प्रयाग येथील स्नानपर्व काळात सुमारे पाऊण लाखांवर वृक्षांचे वाटप आणि लागवड या अवलियाने पूर्ण केली तर स्नान पर्वकाळ संपेपर्यंत सुमारे एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प पंडित माने तसेच त्यांचा मुलगा नवनाथ माने यांनी करण्याचा संकल्प केला आहे या संकल्प साठी माने यांना त्यांची पत्नी सुनीता माने आणि मुलगी अंजली माने यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे
विशेष म्हणजे ज्यांना पंडित मानेंची तळमळ माहित आहे त्या काही मित्रांनी केलेली छोटी मदत हा अपवाद सोडला तर पंडित मानेच्या या स्वयंघोषित वृक्षारोपण संकल्प कोणाच्याही मदतीशिवाय मानेच्या कष्टातून आणि तळमळीतून महिनाभर अविरत चालू आहे.
पहाटे पहाटे उठायचे आदल्या दिवशी आणलेली वृक्ष रोपे मालबारी कटिंग कढीपत्ता तुळश आंबा जांभळ चिंच पेरू यासारखे अन्नसाखळी निर्माण करणारे वृक्ष बी बियाणे घ्यायची आणि प्रयाग गाठायचे दिवसभर क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिराच्या परिसरात स्नान व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगायचे त्यांना वृक्ष रोपे मलबारी कटिंग वाटायचे तसेच ते लावण्याबाबत मार्गदर्शन करायचे मिळाला तर प्रसाद खायचा आणि दिवस मावळ तिला केर्ली येथे येऊन मित्रमंडळींना आपण आज किती लोकांना वृक्ष वाटप केले हे आनंदाने सांगायचे असाच काहीसा दिनक्रम गेली वीस पंचवीस दिवस पंडित चा चालू आहे. त्यांना त्यांचा मुलगा नवनाथ मदतही करत आहे.
दरम्यान गेल्या महिन्याभरात साधारण पाऊण लाख वृक्षारोपण व वृक्ष वाटप चा संकल्प पूर्ण केल्याची माहिती पंडित माने व नवनाथ माने यांनी दिली.
12 फेब्रुवारी पर्यंत आपण एक लाख वर वृक्ष वाटप करणार असल्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला.
अठरा विश्व दारिद्र्य म्हणावे लागेल अशी आर्थिक परिस्थिती असताना देखील गेल्या पंचवीस वर्षात लाखो वृक्षांचे वाटप आणि रोपण करणाऱ्या या पंडित मानेच्या वृक्षारोपण संकल्प आला दातृत्वाची साथ लाभली तर पर्यावरणासाठी अपेक्षित असलेले मोठे काम या ध्येयवेढ्या पंडित माने यांच्याकडून होईल यात शंका नाही.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News