Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAgricultureबनावट खत निर्मितीने शेतकरी हवालदिल ; खुपिरे येथील बनावट खताच्या रॅकेट मुळे...

बनावट खत निर्मितीने शेतकरी हवालदिल ; खुपिरे येथील बनावट खताच्या रॅकेट मुळे शेतकऱ्यांत संताप

कोल्हापूर : श्रीकांत पाटील

कोल्हापूर पश्चिम भागात बनावट खतांचे रॅकेट उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे खतांचे गगनाला भिडले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केली जात आहे. खुपिरे येथील बनावट खत निर्मितीमुळे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या बनावट त्याची पाळेमुळे बाहेर काढण्याची गरज आहे पालकमंत्र्यांनी खते लिंकिंग करू नये असे आदेश दिले असतानाही या बनावट खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचेही आदेश धुडकावले आहेत.

जिल्ह्यात अनेक कंपन्या रासायनिक खतांच्या बरोबर पूरक खते देतात शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते नत्र स्फुरद पालाश याचे प्रमाण नसते कृषी विभागाचे तपास अधिकारी पण चिरीमिरी घेऊन या रॅकेटला सहकार्य करत आहेत कृषी खात्याचे कोणतेच नियंत्रण या खत निर्मिती विभागाला राहिलेले नाही अनेक कंपन्यांनी आपली खते निर्मितीची दुकाने थाटली आहेत. यामध्ये कितपत नत्र, स्फुरद, पालाश असते हे गौडबंगालच आहे. शासनाचेही यावर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. पूर्ण व्यवस्थाच अशा कंपन्यांनी ताब्यात घेतली आहे.
बनावट खत निर्मितीची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे त्यासाठी शासनाने वेगळी समिती तयार करावी शेतकऱ्यांची अशी फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कंपन्यासह कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News