Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialममता कुलकर्णीनं अखेर महामंडलेश्वर पद सोडले

ममता कुलकर्णीनं अखेर महामंडलेश्वर पद सोडले

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिला आहे. इंस्टाग्रावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. ‘आज किन्नर आखाड्यात माझ्याबद्दल वाद सुरू आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वी राहीन’. असं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

Video Player is loading.

Loaded: 0%
Remaining Time 0:00

यंदाच्या महाकुंभमेळ्यात त्यांची महामंडलेश्वर पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पण या नियुक्तीवर अनेक धार्मिक व्यक्तींना आक्षेप घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. त्यामुळं त्यांची या पदावरुन हाकलपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज अखरे त्यांनी या पदाचा कागदोपत्री राजीनामा दिला आहे. 

महामंडलेश्वर बनलेल्या ममतांवर 10 कोटी रुपये देवून ही पदवी घेतल्याचा आरोप होत होता. 24 जानेवारी रोजी प्रयागराज महाकुंभात ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. संगमात स्नान केल्यानंतर त्यांचे पिंडदान करण्यात आले. यानंतर, आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांचा पट्टाभिषेक केला. त्यांचे नवीन नाव श्रीयमाई ममता नंद गिरी असे ठेवण्यात आले. त्या 7 दिवस महाकुंभात राहिल्या.

ममता कुलकर्णी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की…

 मी, महामंडलेश्वर यमाई ममता नंद गिरी, माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. आज, किन्नर आखाड्यात माझ्याबाबत काही समस्या आहेत. मी 25 वर्षे साध्वी होते आणि नेहमीच साध्वी राहीन. मला महामंडलेश्वरांचा मान देण्यात आला. पण काही लोकांसाठी हे आक्षेपार्ह ठरले. मग ते शंकराचार्य असोत किंवा इतर कोणीही. मी 25 वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडले होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News