कोल्हापूर: इंस्टाग्राम वर ओळख झालेल्या आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या मुलग्यास भुयेवाडी तालुका करवीर येथून अपहरण करून सांगली येथे एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले होते.त्या तरुणाची कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कौशल्याने तपास करून सुटका केली .
विशाल मोहन अडसूळ वय 26 राहणार निगवे दुमाला तालुका करवीर असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की निगवे तुम्हाला येतील मोहन दिनकर अडसूळ वय 55 यांचा मुलगा विशाल याचे रविवारी 9 फेब्रुवारी रोजी भुयेवाडी येथील कमानी जवळून चार चाकी गाडीतून अपहरण केले होते. त्याचा तपास करण्यासाठी करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तीन पथके तयार केली होती. अपहरण झालेल्या ठिकाणापासून निर्जन ठिकाणी ऊस शेती व झाडी, झुडपे, पोलिसांनी पिंजून काढली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास सुरू असतानाच हेड कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना विशालचे अपहरण करून श्रीकृष्ण महादेव कोकरे राहणार सांगली याने सांगली येथील अंकली पुलाकडे नेल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून श्रीकृष्ण कोकरे यास ताब्यात घेतले. पहिल्यांदा त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली पण अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशाल याने कोकरे यांची मुलगी श्रुती बरोबर इंस्टाग्राम वर ओळख वाढवून सात महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे तो प्रेमविवाह मान्य नसल्याने कोकरे यांनी अन्य चार लोकांच्या मदतीने विशालचे अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी विशालला डांबून ठेवलेल्या सांगली येथील फ्लॅटचे कुलूप तोडून बाहेर काढले. याप्रकरणी श्रीकृष्ण कोकरे याचे बरोबर धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील व 56 राहणार कवठे पिरान, राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी वय 33 राहणार कुपवाड एमआयडीसी सावळी तालुका मिरज यांना ताब्यात घेतले. उर्वरित चार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अमोल कोळेकर ,रामचंद्र कोळी ,सुरेश पाटील, संदीप बेंद्रे, लखन पाटील, सागर माने युवराज पाटील यांनी ही कामगिरी बजावली.