Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALमंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले; मंत्रालयातूनच दिला थेट आदेश, नेमकं घडलं तरी काय?

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले; मंत्रालयातूनच दिला थेट आदेश, नेमकं घडलं तरी काय?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षखेखाली पार पडली. यावेळी राज्यातील कामांचा आढावा घेताना पालक सचिवांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. या पालक सचिवांना प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्षस्थळी जाऊन कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही काही पालक सचिव त्यांना नेमून देण्यात आलेल्या जिल्ह्यात पाऊलदेखील ठेवलेलं नाही. त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

 तत्काळ सर्व पालक सचिवांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, . प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, 11 पालक सचिवांनी आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. 

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आलं?

देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी.

प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

(जलसंपदा विभाग)

 जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन

शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

(जलसंपदा विभाग)

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती

(मदत व पुनर्वसन विभाग)

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News