महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एचएससी बोर्ड च्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरूवात होत आहे.
शरद गोसावी‚ अध्यक्ष एचएससी बोर्ड म्हणालेे‚गतवर्षीच्या वेळापत्रकानुसार यावर्षी 10 दिवस आधी परीक्षा आधी घेण्यात येत आहे.त्यासंदर्भात हरकती मागवल्या होत्या.
10 दिवस आधी परीक्षा आधी घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अंतिम निकाल देखील लवकर जाहीर करणार, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार आहे.”
राज्यातील 3376 परीक्षा केंद्रापैकी 818 केंद्रावर कॉपी प्रकरण आढळून आल्यामुळे या केंद्रावरील पर्यवेक्षक बदलण्यात आले आहेत. परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 लाख 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, याआधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
शाखानिहाय विद्यार्थी
विज्ञान 7 लाख 68 हजार 967
कला 3 लाख 80 हजार 410
वाणिज्य 3 लाख 19 हजार 439
परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी !
परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे,. मदत करणारे त्यांच्यावर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे