Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALकृष्णराज महाडिकांसोबतच्या भेटीनंतर रिंकूचा मूड स्विंग ..?

कृष्णराज महाडिकांसोबतच्या भेटीनंतर रिंकूचा मूड स्विंग ..?

सैराट चित्रपट फेम रिंकु राजगुरूने तिच्या एका स्टेटसने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.कोल्हापुरातील भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच रिंकुची खास इंस्टा स्टोरी पाहता सोशल मीडियावर तिचे आणि महाडिकांचे चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत. 

कृष्णराज महाडिक यांनी दोनदिवसांपूर्वी, सोशल मीडियावर  रिंकू राजगुरूसोबतचा फोटो पोस्ट केला होता. आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,” असे कृष्णराज महाडिक यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं. 

रिंकुची नेमकी स्टोरी काय?

रिंकुने एक फोटो स्टोरीवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या कपाळावर कुंकू आणि चंद्रकोर टिकली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रिंकुने खास गाण्याची निवड केली आहे. रिंकूने ‘अपने रंग मे मुझको रंग दे’ या गाण्याचे संगीत या फोटो जोडलं आहे.

 विशेष म्हणजे, फोटोमधील ड्रेस आणि कृष्णराज महाडिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकून परिधान केलेला ड्रेस एकच आहे. तिच्या या स्टोरीनंतर अनेक अर्थ काढले जात आहेत. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News