Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeशीख दंगली प्रकरणी काँग्रेस नेते सज्जनकुमार दोषी; बाप-लेकाला जाळून मारलं होतं

शीख दंगली प्रकरणी काँग्रेस नेते सज्जनकुमार दोषी; बाप-लेकाला जाळून मारलं होतं

1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सज्जनकुमार यांच्या शिक्षेवर 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 

जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची सरस्वती विहारमध्ये 1984 च्या शीखविरोधी दंगलीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांना आरोपी ठरवण्यात आलं आहे. 

या हत्याप्रकरणात पंजाबी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास विशेष पथकाकडे सोपविण्यात आला होताय 2021 मध्ये म्हणजेच गुन्ह्याच्या 36 वर्षांनी सज्जनकुमार यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. याचा निकाल आता जवळपास 40 वर्षांनी लागला आहे. 

सज्जन कुमार यांच्यावर काय आहेत आरोप

कोर्टाने आरोपी सज्जन कुमार यांच्याविरोधात IPC कलमान्वये 147/148/149/302/308/323/395/397/427/436/440 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेत. 

एसआयटीने सज्जन कुमार हे संतप्त जमावाचं नेतृत्त्व करत होते. त्यांना प्रेरित केल्यामुळे टोळक्याने दोन व्यक्तींना जिवंत पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घरातील वस्तू आणि संपत्तीचं नुकसान केलं होतं. घरातील वस्तूंची नासधूस केली.

संतप्त जमावाने पीडित लोकांचं घर पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घराच्यांनाही मारहाण केली होती. एक नोव्हेंबर 2023 रोजी कोर्टाने या प्रकरणी सज्जन कुमार यांचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी सज्जन कुमार यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News