कोल्हापूर:
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स इको रेंजर्स दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज या पर्यावरणीय स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोकणीरान माणूस प्रसाद गावडे यांनी वरील उद्गार काढले.
सध्या नेहमी चर्चेत असलेला विषय जसे की ग्लोबल वार्मिंग व त्याचे गंभीर दुष्परिणाम यांच्या मुळाशी गेल्यास मानवी हव्यास, स्वकेंद्रित जगणे, बेफिकीरपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणा विषयी असणारी उदासीनता अशा बऱ्याच घटना कारणीभूत आहेत. पर्यावरणीय ऱ्हासातून होत असणारा विकास हा शाश्वत नाही. कारण त्यात एक अधिक गरजांची पूर्ती केली जाते. केवळ आर्थिक किंमत ठरवण्यापेक्षा त्याची पर्यावरणीय किंमत सर्वच लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
वास्तविक पाहता भारतातील बहुतांशी खेडी व विशेष करून सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली खेडी ही साधन संपन्न असून त्यांना पाश्चात्त्य करण्याची गरज नाही परंतु समाजाच्या प्रभावामुळे खेडी शहरासारखी उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी भूतान देशाचे उदाहरण सर्वांसाठी आदर्शवाद असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सुमारे 200 हून अधिक विविध क्षेत्रांशी निगडित प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी पर्यावरणीय संदर्भातील महाविद्यालय स्तरावरील उपाय योजना बाबत सादरीकरण करण्यात आले यात गडहिंग्लजच्या शिवराज कॉलेजने प्रथम क्रमांक राजाराम कॉलेज द्वितीयतर शहीद लक्ष्मीबाई कॉलेज,टिटवे तृतीय क्रमांक पटकावला.त्यांना अनुक्रमे रु. 7000 रु. 5000 रू.3000 व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी प्राध्यापक डॉ.व्ही.बी. शिंपले व डॉ. रसिया पडळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे सामाजिक बांधिलकी श्री. शरद आजगेकर यांनी केले तर प्रा. डॉ.दीपक भोसले यांनी कार्यक्रमाचे संचालन व लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विनायक देसाई यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनुष्यबळ विकास व्यवस्थापक श्री हरीश सैवे, श्री संजय बेनके, श्री मंगेश सावंत, श्री मोहन तायडे डॉ. सोनिया राजपूत, डॉ. सुरेश आपटे, शिवप्रतिष्ठान कराड चे प्रमोद यांचे सहकार्य लाभले.



