आदमापूर/प्रतिनिधी: आदमापूर(तार.भुदरगड) येथील श्री. बाळूमामा देवालय देवस्थानला अ वर्ग दर्जा देण्यात याव़ा.अशी मागणी आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव यांनी विधान परिषदेचे सभापती श्रीराम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नुकताच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आदमापुर दौरा केला होता या दौऱ्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वतीने आदमापूर देवस्थानाला अ दर्जा मिळावा तसेच भक्तांच्या सोयी सोयीसाठी ग्रामपंचायत तिला वार्षिक एक कोटी विशेष निधीची तरतूद करून मिळावी असे निवेदन दिले. निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे दर अमावस्येला देवगड निपाणी राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था कोलमडते त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा तसेच एकेरी वाहतूक मार्ग, पोलीस चौकी व वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात यावी त्याचबरोबर मरगुबाई मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारत तसेच आदमापुर मधील रस्ते, गटर्स व गावांमधील बायपास रस्ते यांसाठी वार्षिक निधी मंजूर करून हा खर्च शासनामार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच विजय गुरव सागर पाटील अनिल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभेत आदमापूर ग्रामपंचायतीला वार्षिक १ कोटीच्या तरतूदीची मागणी : सरपंच विजयराव गुरव यांच्या मागणीला यश. आदमापूर/प्रतिनिधी: गेले अनेक वर्षे चर्चेत असलेल्या व देशात वेगाने प्रसिध्द पावत असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांच्या तीर्थक्षेत्रास अ वर्ग दर्जा देण्यात यावा तसेच या आदमापूर ग्रामपंचायतीला विविध विकासासाठी वार्षिक १ कोटीची तरतूद करावी अशा आशयाची मागणी विधानसभेच्या कामकाजावेळी तारांकित प्रश्नात करण्यात आली. भक्तांचा महापूर या दैवताकडे सुरू असल्याने भक्तांची गैरसो़य टाळण्यासाठी येथील सरपंच विजयराव गुरव यांना शासनाकडे वारंवार ही मागणी लावून धरली आहे.याकडे मंत्रालयीन कामकाजात लक्ष वेधण्यात आले.भक्तांची ही गैरसोय टाळण्यासाठी विविध सुखसुविधा करण्याच्या मागणीवर भर देण्यात आला.यासाठी वार्षिक एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात यावी असे सभागृहाला संबंधित आमदार महोदयांनी सुचित केले.विनाविलंब ही सेवा देण्यात यावी असे सुचित करण्यात आले. याबाबत विधानसभा सचिव यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना पत्र लिहिले आहे.या बाबत आमदार मोनिका राजळे (शेवगाव -पाथर्डी), आमदार सत्यजित देशमुख (शिराळा), आमदार संजय केळकर (ठाणे) यांनी सभागृहात ही मागणी उचलून धरली. त्यामूळे आदमापूर ग्रामपंचायतीला वार्षिक १ कोटी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.