Monday, November 10, 2025
Google search engine
HomePOLITICALसंतोष देशमुखांच्या पत्नीची विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती

संतोष देशमुखांच्या पत्नीची विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती

बीडच्या मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले तरी अजूनही त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळं राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच, देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. 

केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरीची ऑफर त्यांना देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संस्था रमेश आडसकर यांनी दिली आहे. 

रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्ती पत्र दिलं. हे पत्र स्विकारताना संतोष देशमुख यांच्या आई आणि त्यांचा परिवार उपस्थित होता. 

संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर आडसमधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयालाने अश्विनी देशमुख यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. या हत्येमागे वाल्मिक कराड टोळीचा हात असल्याचं समोर आलं. त्यामधील सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर एक आरोपी, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. या हत्येप्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून संशयित आरोप असणार  वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News