Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeतांब्याचे बंब चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तांब्याचे बंब चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


कोल्हापूर: घरासमोरील तांब्याचे बंब चोरण्या चे प्रकार वाढले होते याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खास पथक तयार केले होते. या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून एका बालकासह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख 40 हजार रुपये किमतीचे चोरलेले आठ बंब हस्तगत केले.

स्वप्निल आनंदा सोनाळे वय 23 रा.म्हसोबा माळवाडी गोकुळ शिरगाव तालुका करवीर, राज शिवाजी धामणीकर वय 19 रा. रेणुका कॉलनी उजळवाडी तालुका करवीर व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले . या तिघांनी गोकुळ शिरगाव राजारामपुरी व करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे आठ तांब्याचे बंब चोरले होते साई पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी आदींनीही कारवाई केली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News