दोनवडे :
सरपंचांच्या दाखल्याने बनावट वारसाची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार साबळेवाडी (ता. करवीर) येथे घडला आहे. वडिलांच्या निधनानंतर वारस प्रतिज्ञापत्रावर एका व्यक्तीने स्वतःचे नाव भाऊ म्हणून घातले. या व्यक्तीला वारस म्हणून सरपंचांनी चक्क स्वतःच्या सहीने दाखला दिला.
भूमापन कार्यालयानेही बनावट वारस खरे असल्याचा लेखी जबाब नोंदवला. घडलेल्या या प्रकाराने साबळेवाडी गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
साबळेवाडी गावातील एका व्यक्तीचे २५ वर्षांपूर्वी निधन झाले होते.संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर मालमत्ता पत्रकावर आपले नाव नोंद व्हावे यासाठी मृताच्या वारस असणाऱ्या एकाने प्रतिज्ञापत्र तयार केले. मात्र, या प्रतिज्ञापत्रात त्याचा भाऊ नसणाऱ्या एका बनावट व्यक्तीचे नाव नोंद केले गेले.
साबळेवाडीच्या सरपंचांनीही मार्च २०२३ मध्ये त्यांच्या सहीचा वारस दाखला दिला. या दाखल्याच्या आधारे संबंधित व्यक्तीने नगर भूमापनच्या मालमत्तापत्रकामध्ये फेरफार करून बनावट वारसाचे नाव घुसडले. नगरघूमापनला वारस नोंद करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रासोबत ही चुकीची आणि बनावट कागदपत्रे जोडलेली आहेत. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. तरीही वेळेत यावर कारवाई केलेली नाही. वारस दाखला देताना सरपंचांनी योग्य तपासणी करणे आवश्यक होते. सरपंचांनी शहानिशा केली नाही. नगरभूमापन कार्यालयाकडूनही अशी नोंद झाली आहे.
कागदपत्रासोबत ही चुकीची आणि बनावट कागदपत्रे जोडलेली आहेत. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. तरीही वेळेत यावर कारवाई केलेली नाही. वारस दाखला देताना सरपंचांनी योग्य तपासणी करणे आवश्यक होते. सरपंचांनी शहानिशा केली नाही. नगरभूमापन कार्यालयाकडूनही अशी नोंद झाली आहे. प्रशासनाचा गलथांग कारभार चव्हाट्यावर आला आहे.