कोथळी करवीर प्रतिनिधी:
नागपूरहुन गोव्याला निघालेला आणि जवळपास 25 टन पत्रे असणारा ट्रक कोल्हापूर राधानगरी रोडवर हळदी जवळ घसरल्यामुळे ट्रक मध्ये बसलेले दोन युवक पत्रामध्ये सापडून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता घडली.
घटनास्थळी मिळालेली अधिक अधिक माहिती अशी , विशाल रावणखुळे हा भंडारा जिल्ह्यातील चालक ट्रक क्रमांक 36 एफ 4239 मधून पत्रे घेऊन नागपूर वरुन गोव्याला चालला होता. शनिवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास करवीर हळदी ता करवीर येथे आल्यानंतर ट्रक एका बाजूला घसरल्यामुळे आत भरलेले पत्रे ट्रकच्या एका बाजूला सरकले यावेळी ट्रक मध्ये बसलेले दीपक निंबाळते रा. वरदी अश्विन म्हात्रे रा सोनुर्ली हे दोघेही व पत्रा आणि हौदयात अडकले सुदैवाने जीवितहानी टाळले असली तरी दोघेही या पत्रामुळे गंभीर जखमी झालेले आहेत पहाटे घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावर रहदारी कमी असली तरी हळदी गावातील ग्रामस्थ व युवकांनी तातडीने धाव घेऊन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने ट्रक मधील अडकलेले पत्रे बाजूला करून जखमी युवकांना बाहेर काढण्यात आले. व तात्काळ त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले हळदी ग्रामस्थांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे या युवकांचे प्राण वाचले.