Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomePOLITICALडॅमेज कंट्रोल साठी शिवसेनेकडून वसंत मोरेंवर जबाबदारी

डॅमेज कंट्रोल साठी शिवसेनेकडून वसंत मोरेंवर जबाबदारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्षांना पुन्हा एकदा गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकिकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे तर दुसरीकडे पक्षातून काही नेते नाराजी दर्शवत बाहेर पडत आहेत. ठाकरे सेनेसोबत पुण्यात काही वेगळी परिस्थिती पाहायला मिळत नाही. अशातच पक्षप्रमुख ठाकरेंनी वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी महापालिकेचे निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांची निवड केली आहे. यानंतर वसंत मोरे तातडीने कामाला लागल्याची समजते. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातली इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरेंनी केलं आहे. 

या मुलाखती शिवसेने मध्यवर्ती कार्यालय पुलाची वाडी येते होणार आहेत. सोमवारी 17 फेब्रुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर विधानसभा. त्यानंतर दुपारी 4 वाजता हडपसर विधानसभा, तर सायंकाळी 6 वाजता पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा येथे मुलाखती पार पडणार असल्याचे समजते.

तर मंगळवारी 18 फेब्रुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पर्वती विधानसभा, त्यानंतर 4 वाजता कसबा विधानसभा. 5 वाजता वडगाव शेरी विधानसभा तर सांयकाळी 6 वाजता खडकवासा मतदारसंघात मुलखत होणार आहे. 

दोन दिवसांपूर्वी, शिवसेनेनं  महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुख पदी निवड झाल्यानंतर  मोरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर मनसे कार्यालयाच्या बाहेर लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News