कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात आरोग्याची पंढरी निर्माण करणारे राज्याचे दिवंगत माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांची 73 वी जयंती त्यांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी साजरी करण्यात आली. खानविलकर कुटुंबासह जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांनी दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर, विश्वविजय खानविलकर,सुमित्रा देवी खानविलकर,सिद्धी विजय खानविलकर,मंत्री चंद्रकांत दादा पाटील,गोकुळचे संचालक अजित नरके,कुंभीचे संचालक संजय पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे ,आदित्य पाटील, केर्ली चे मा. सरपंच चंद्रकांत पाटील ,संजय गांधी योजनेचे सदस्य संभाजी पाटील,अमित सामंत,बाजीराव कांबळे,विजय यादव,आप्पासो धनवडे,इंद्रराज देसाई, Ab9 मराठी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक दत्तात्रय बोरगे, दैनिक तरुण भारत चे प्राध्यापक एस पी चौगले,सीपीआर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी बंटी सावंत, सुरेश पाटील (बापू ),सचिन पाटील,किरण घाडगे, प्रकाश पाटील, शितल गवळी, सर्जेराव पाटील मुडशिंगी सिकंदर मुजावर आदी कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.