नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (15 फेबुवारी) एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (15 फेबुवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अचानक रात्री उशीरा प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे येथे चेंगराचेंगरीची घटनाघडली असून यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखम आहेत.
रेल्वे पोलिस आणि दिल्ली पोलिस यांनी जखमींना एलएनपेजी आणि लेडी हार्डींग रुग्णालयात दाखल केलं आङे. हजारो भाविक एकाच वेळी प्रयागराजला जाण्यासाठी जमल्यामुळं ही घटना घडील आहे. असं रेल्वेनं सांगितल आहे.प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर लोक आपपाल्या बोगीत चढण्यासाठी धावत होते यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. एस्केलेटरवरील धक्क्यामुळं काही प्रवासी चिरडले गेले. असही सांगण्यात येत आहे.