फेब्रुवारी महिन्यातील पैसे खात्यात कधी जमा होणार ? या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महिलावर्गांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तारीख जाहीर करत मोठा दिलासा दिला आहे. एकिकडे राज्य सरकारने या योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेत अपात्र महिलांच्या खात्यात पैसे बंद केले आहेत. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहेत. अशातच अजित पवारांना पात्र असलेल्या बहिणींना खुशखबर दिली आहे.
अजित पवार शनिवारी जालना दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा मिळाणाऱ्या पैशांवर भाष्य केलं. या महिन्याचा हप्ता पुढच्या आठ दिवसांत खात्यात जमा होईल असं यावेळी पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याचे पैसे 25 तारखेपूर्वी ख्यातत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यापूर्वी महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.