Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALउपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द..

उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आङे. अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी प्रकृती ठीक नसल्याचं सांगत आजचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केलं आहेत. खरतरं काल नाशिकमध्येत पवारांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली होती. नाशिकमध्ये आमदार सरोज आहेर यांच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. 

यावेळी त्यांनी भाषणादरम्यान, ‘आत्ताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाहीये. मी जास्त बोलणार नाही’ असं सांगितलं होते.  त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते. मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळं त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

काल अजित पवारांची शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी पुण्यातील जुन्नर येथे भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चादेखील झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मात्र, दोन्ही नेत्यांनी  बीडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.  त्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगत सुरु असलेल्या चर्चेला पुर्ण विराम दिला. 

तर दुसरीकडे काल अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानवर वेगळी भूमिका मांडली असल्याचे पाहायला मिळालं. राजीनामा द्यायचा की नाही हे स्वत: धनंजय मुंडेंनी ठरवावं, असं मोठं वक्तव्य करत अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मुंडेंवर सोपवला आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News