विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे तर दुसरीकडे राज्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ ची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात उड्या घेतल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्या खासदाराने शिंदे गटाबाबत खळबळजनक दावं केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लक्ष्य केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजन साळीव यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याने ठाकरेंची साथ सोडत दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्येदेखील होते, दरम्यान, पक्ष सोडावा यासाठी पैशांची ऑफर देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या खासदाराने केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख वणी येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी कजूट ठेवण्याचे आवाहन करत शिंदे गटावर निशाणा साधला. राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. पक्ष संघटना मोठी केली. परंतु शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत आहे. पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी यावेळी केला.
विधान सभा निवडणुकीच्या पराभवानंतर ठाकरेंना धक्यावर धक्के बसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केले. ठाकरेचा निष्ठावंत मानला जाणारा बडा नेता राजन साळवी यांनी गेल्या आठवड्यात शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सभापती पवन पवार यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळं ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.