कोथळी करवीर/ तानाजी पोवार:
कुरुकली तालुका करवीर येथील शिवराष्ट्र कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा धावणे रिलीज स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार १९फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता ४ x१०० मिटर धावणे रिले स्पर्धा पाचवी ते सातवी मुलासाठी आयोजित करण्यात आली आहे .कुरुकली मेन रोड वरती सकाळी सात वाजता या स्पर्धा होतील. वक्तृत्व स्पर्धा शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी असून इयत्ता पाचवी ते सातवी मुलांकरता सायंकाळी शिव राष्ट्र चौक येथे सायंकाळी सात वाजता होणार आहेत. सकाळी साडेसात वाजता रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले आह स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी सात वाजता होणार आहे. या स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.